3 ऑक्टोंबरच्या मंदिरे समितीच्या मिटींगमध्ये खालील मागण्या मान्य करा
अन्यथा कार्तिकी एकादशीला येणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्यासमोर निदर्शन करणार- दत्तात्रय बडवे-शिंदे
पंढरपूर- आम्ही गेले अनेक दिवस श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या, कर्मचाऱ्यांच्या व मंदिर समितीच्या हितासाठी अनेक मागण्या केल्या आहेत परंतू त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे तरी खालील मागण्या दि.3 ऑक्टोंबर 2023 च्या मंदिरे समितीच्या मिटींगमध्ये मान्य कराव्यात ही विनंती करीत आहोत. तरी आमच्या खालील मागण्या मान्य न झाल्यास कार्तिकी एकादशीला येणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्यासमोर निदर्शन करणार आहोत, याची नोंद घ्यावी.
आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत मागणी नं.1 - मंदिर समिती कर्मचाऱ्यास 7 वा वेतन लागू करावा यासाठी ठराव करून कार्यवाही सुरू करा. याबाबत मी व राळेगणसिध्दी ग्रामपंचायत सदस्य पठारे यांच्यावतीने अर्ज निवेदन दिले आहेत. मागणी नं.2 - मंदिरात सशुल्क दर्शन सुरू करणेसाठी पुरातत्व खात्याच्या अधिनियमात बदल करण्यासाठी मंदिर समितीने ठराव करून त्याची मागणी पुरातत्व खात्यामार्फत मा.पंतप्रधान साहेब भारत सरकार यांच्याकडे करण्यात यावी.तसे निवेदन कार्तिकी एकादशीला दिवशी उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात यावे.मागणी नं.3 - दररोज नित्यपूजा व शेजारतीला भाविकांना गरूडखांबापासून मुखदर्शन सुरू करावे. सध्या पितळी दरवाज्यापासून नित्यपुजेचे दर्शन घेतले जाते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. मागणी नं.4 - तुळशीपुजेची नोंद संत तुकाराम भवन कार्यालयातून करण्यात यावी. मागणी नं.5- हत्ती दरवाज्याचा वापर करून मुखदर्शनाची रांग 15 फुटावरून करण्यात यावी. मागणी नं.6 - दर महिन्याच्या दशमी, एकादशी, द्वादशी व रविवारी तुळशीपुजा बंद करण्यात याव्यात. फक्त पददर्शन रांग सुरू ठेवण्यात यावी. मागणी नं.7- प्रक्षाळपुजा अंघोळ प्रकरणातील पुजारी व नित्योपचार प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी 3 ऑक्टोंबरच्या मिटींगमध्ये कार्यालयाबाहेर मी मागणी फलक घेवून लक्ष्य वेधणार आहे. तरी वरील भाविकांच्या हिताच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. या निवेदनाची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी प्रत- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोा, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार सोा , जनतेच्या हिताचे तात्काळ निर्णय घेणारे मा.जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद सोा, मा.कार्यकारी अधिकारी सोा, सहअध्यक्ष व सदस्य श्री वि.रू.मंदिरे समिती पंढरपूर, मा.डी.वाय.एस.पी.सोा, पंढरपूर विभाग, मा.पोलीस निरीक्षक सोा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आली आहे.



