17 आणि 18 ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या प्रांगणात वजनी गट, मातीतली कुस्ती, मॅटवरील कुस्ती आणि खुला गट अशा चार भागांमध्ये निवड चाचणीला सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि कुस्तीतील जागतिक सुवर्णपदक विजेते राहुल आवारे यांच्या हस्ते या निवड चाचणीचे उद्घाटन होईल. सलग दोन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये कुमार केसरी स्पर्धेची ही निवड चाचणी होणार आहे. तर 18 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता आमदार समाधान आवताडे आणि तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर उमेशराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली या निवड चाचणीतील कुस्तीगिरांचा बक्षीस वितरण समारंभ होईल.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड आणि उपसभापती राजूबापू गावडे यांच्या माध्यमातून आणि पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सहकार्यातून 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे नियोजन होत आहे. या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवोदित कुस्तीपटू पैलवानांनी सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी उपसभापती राजुबापू गावडे यांनी केले आहे.

