पंढरपूर : गोपाळपूर येथील मातोश्री नगर येथे जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी गोपाळपूरचे मोनेश्वर सुतार यांची सोलापूर जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सुतार यांचे अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी बोलताना राजेंद्र सुतार म्हणाले की बांधकाम कामगारासाठी सरकारच्या अनेक योजना या योजना तुमच्यापर्यंत नाहीत. त्या पोहचविण्याचे काम आमच्या जिद्द बांधकाम संघटनेमार्फत केले जात आहे. प्रत्येक गावात याविषयी जनजागृती केली जाणार आहे. सुरूवातीस आपणास ग्रामसेवक किंवा इंजिनिअर चा बांधकाम कामगार म्हणून दाखला घ्यावा व त्यानंतर आपल्या जिद्द संघटनेत नांव नोंदणी करा. नांव नोंदणी केल्यानंतर तुम्ही अधिकृत बांधकाम कामगार होणार आहात. त्यानंतर तुम्हाला शासनाच्या अनेक सवलती मिळणार आहेत. बांधकाम कामगारासाठी शासनाने सुरक्षा संचाचे (पेटी) वाटप केले आहे.यामध्ये हेल्मेट, मोजे,डबा,जॅकेट बॅटरी,बुट असे साहित्य दिले आहे. यांचा वापर सर्वांनी करावा. समजा एखादा अपघात झाला तर यावेळी ह्या सर्व सामानाचा आपण वापर केला असेल तर अपघात विमा ही तुम्हाला मिळणार आहे. पण हे साहीत्य आपण वापरले नाही तर कुठलीही सवलत शासन देत नाही.
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सवलती आहेत.1 ते 7 शिष्यवृत्ती एकाम मुलांस 2500 रू.मिळते, 8 वी ते 10 एका मुलांस 5000 रू.शिष्यवृत्ती मिळते, 11 वी 12 साठी 10,000 रू. 13 ते 15 वी ला 20,000 रू.शिष्यवृत्ती मिळते, तर 10 वीला 50 % च्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांला एक्स्ट्रा 10,000 रू. मिळतात तर इंजिनिअरींगसाठी 60,000 रू. तर डॉक्टरसाठी 1,00,000 रू.मिळतात अशा अनेक योजना बांधकाम कामगारासाठी शासनाने दिल्या आहेत. यांचा फायदा सर्व बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावा काही अडचण आल्यास संघटना त्यास मदत करीत बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी 30,000 रू.मदत मिळणार आहे. दोन बाळंतपणासाठी शासनातर्फे मदत मिळणार आहे.
सदर प्रसंगी संस्थापक अध्रक्ष, मा श्री राजेंद्र सुतार, सोलापूर जिल्हा अध्रक्ष मा,श्री,मोनेश्वर सुतार गोपाळपूर व उपाध्रक्ष मा, श्री रोगेश सुतार आकुलगाव ता,माढा जिल्हा सोलापूर, जिद्द बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्र चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रांच्रा नेतृत्वाखाली संघटनेचे पोस्टर लावून सोलापूर जिल्ह्यामधे संघटना वाढी साठी शुभेच्छा देण्रात आल्रा व गावातील गावकरी सरपंच विलास मस्के उपसरपंच इक्बाल कांबळे ,सचिन जाधव, मंडळाचे अध्रक्ष रोगेश कांबळे, उपस्थित होते रांनी शुभेच्छा दिल्रा.




