पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील भोसे हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून, या गावास जोडणारे अनेक रस्ते अस्तित्वात आहेत. हे रस्ते अनेक वर्षांपासून दुरुस्त झाले नसल्याने, खराब झाले आहेत.भोसे घोटी रस्ता, रानमळा रस्ता, शेवते रस्ता, खेडभोसे रस्ता या रस्त्यांची दुरुस्ती होऊन मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून आ. बबनराव शिंदे यांना करण्यात आली. या रस्त्यांची कामे तात्काळ करण्यात येतील, असे आ.बबनराव शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
रविवार दि.२२ ऑक्टोंबर रोजी याबाबतचे निवेदन आ. बबनदादा शिंदे यांना देण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, हरिचंद तळेकर, मोहन काका जमदाडे, सुभाष घुले, नवनाथ माळी, रतन नाईकनवरे आदीसह भोसे येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
भोसे ते शेवते शिवरस्ता अंदाजे ३ किमी. , पालखी मार्गाला जोडणारा जोडणारा भोसे ते घोटी रस्ता २ किमी, भोसे ते जुना पंढरपूर रोड ३ किमी, भोसे ते खेडभोसे रस्ता भोसेकडून २ किमी. याशिवाय भोसे ते खेदभोसे रस्त्याकडूंन ३४ फाटयाकडे जाणाऱ्या २ किमी रस्त्याचे खडीकरण करून मिळावे ,अशी मागणी यावेळी करण्यात आली. आ.बबनराव शिंदे यांनी या सर्व रस्त्यांच्या कामास मंजुरी घेऊन लवकरात लवकर या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, असे मोरे यांच्या शिष्टंडळास आश्वस्थ केले.
पंढरपूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर पडताच, हनुमंत मोरे यांनी कामाचा धडाका उठवला असून, एखाद्या समाजसेवकास ज्यावेळी एखादे राजकीय पद मिळते ,यावेळी त्याचा फायदा निश्चितच समाजाला होत असतो.पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्यामुळे आगामी काळात संपतील,अशी आशा येथील नागरिकांना वाटू लागली आहे.


