सहकार मंत्र्यांकडून आदर्श चेअरमन पुरस्कार -- हा पुरस्कार श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना समर्पित

0


प्रतिनिधी/- भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक ज्यांनी अल्पवधीन काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उंच गरुड भरारी घेतली. कोणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये प्रकल्प बंद करून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरून आपल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करून लाखो जणांना जीवदान दिले.

 बारा वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५दिवसात सुरू करून आपल्या कामाची चुणूक दाखवली तसेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद अवस्थेत असताना उत्कृष्ट नियोजन व कामाची सचोटी लावून यशस्वी गाळप केले याच अनुषंगाने चेअरमन अध्यक्ष अभिजीत पाटील यांना दैनिक नवराष्ट्रने आदर्श चेअरमन पुरस्कार म्हणून घोषित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)