“न्यु सातारा बी.सी.ए मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न”

0

प्रतिनिधी:-    न्यु सातारा समूह ,मुंबई संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए कोर्टी-पंढरपूर मध्ये बी.सी.ए भाग -१ साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत बी.सी.ए.भाग- २ व ३ च्या वतीने स्वागत समारंभ घेऊन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले .यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे प्राचार्य. डॉ. तंटक एन.एन, संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी व विभाग प्रमुख प्रा. प्रवीण ताठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून करण्यात आले .यानंतर भाग-१ मधील विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयातील काही अनुभव मनोगतातून व्यक्त केले ,तसेच बी.सी.ए. भाग- २ व ३ मधील विद्यार्थ्यांनी देखील नवोदित विद्यार्थ्यांचे मनोगतातून स्वागत केले व या नंतर भाग- १ मधील विद्यार्थ्यान करिता संगीत-खुर्ची  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

                                         कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉ.तंटक एन.एन यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काठोर   परिश्रम करणे अनिर्वार्य असल्याचे सांगितले .आधुनिक काळामध्ये बी.सी.ए या पदवी नंतर असणाऱ्या उज्वल संधी या बद्दल विशेष मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.तंटक एन.एन, संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी, विभाग प्रमुख प्रा.प्रविण ताठे, प्रा.गोडसे, प्रा.कुलकर्णी, प्रा.सोनुले, प्रा.पाटोळे, प्रा.बडवे, प्रा.उत्पात, प्रा.पाटील, प्रा.लोखंडे, प्रा.पवार इत्यादी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते .

                                          कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.सी.ए भाग- २ चा विद्यार्थी चि.ऋतुराज एवळे यांनी केले ,सूत्र संचालन भाग - २ च्या विद्यार्थ्यांनी कु.लझीना सय्यद,व कु.प्राची भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन चि.माळी यांनी केले. वरील कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.राजाराम (नाना)निकम साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)