पंढरपूर - १ मे कामगार दिनानिमित्त शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटी व सर्व सेल यांच्या वतीने कामगार दिन व १ मे झेंडावंदन करून साजरा करण्यात आला याप्रसंगी जेष्ठ कामगाराच्या हस्ते झेंडावंदन करून त्यांना झेंडावंदनाचा मान देऊन सर्व महिला व पुरुष कामगारांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महिला कामगारांना माननीय सुनेत्रा ताई पवार यांच्या तर्फे साडी वाटप करण्यात आले व विधानसभा अध्यक्ष पंढरपूर मीडिया सेल बाळासाहेब आसबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्राताई पवार व अध्यक्ष बजरंग दाजी बागल होते .
याप्रसंगी शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी व तालुकाध्यक्ष हनुमंतराव मोरे .युवक जिल्हाध्यक्ष सूनंजयदादा पवार जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर .राजू उराडे . तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील. किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष अक्षय शेळके समीर कोळी. संदीप पाटील .शिवाजी राजे धोत्रे. युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे दीपक भोसले. नागनाथ अधटराव. मिलिंद आढवळकर .राजेंद्र गोळे बाहुलेकर. आदापुरे .देवानंद इरकल .सुदीप पवार .शशिकांत चंदनशिवे .पुरुषोत्तम देशमुख. अजय गंगेकर इत्यादी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


