श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या--- एक मे कामगार दिनी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज

0


 पंढरपूर - पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या मान्य करण्यासाठी एक मे कामगार दिनी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतील कर्मचाऱ्यांना शासनाच्या स्थायी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावेत असे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. असे असतानाही मंदिर समिती कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामगार दिन १ मे रोजी काळ्याफिती लावून कामकाज केले असल्याचे दिसून आले.

मंदिर समिती मधील कामावर असणारे कर्मचारी यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष, सहराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश पारित केलेले आहेत की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच मंदिर समितीच्या आस्थापणे वरील कर्मचाऱ्यांना देखील वेतन व भत्ते देण्यात यावेत परंतु पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सक्षम असूनही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे.

त्यामुळे कर्मचारी हे १ मे रोजी आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण वेतन व भत्ते कर्मचाऱ्यांना अदा करावेत अन्यथा आपला वेळ काढूपणा आडमुठे धोरणाचा निषेध म्हणून कर्मचाऱ्याकडून कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब केला जाईल ,कामगारावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले. याची वेळीच दखल घेऊन सकारात्मक कारवाई करावी. अन्यथा सर्व कर्मचाऱ्या समवेत उपोषण करण्यात येईल असा इशारा मंदिर समितीला देण्यात आला आहे .

यावेळी सुधाकर घोडके, राजेंद्र सुभेदार, प्रकाश पाटील, संजय कोकीळ, विशाल देवकते, दशरथ देवकुळे, महेश भिसे, अरुण सरगर, प्रशांत वराडे, दत्तात्रय इंगळे, सुरज तेली, संजय मदने, शहाजी देवकर, सुनील गुरव, सुजाता कोकीळ, मनीषा जायकर इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)