पंढरपूर : ज्या वित्तीय संस्थांनी आर्थिक शिस्त पाळली त्या संस्था यशस्वी झाल्या आहेत. आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची असल्याने त्यात कोणतीही तडजोड नसावी असे स्पष्ट मत पंढरपूर येथील सु. रा .परिचारक पतसंस्थेचे चेअरमन तथा काॅंग्रेस कमिटीचे वरीष्ठ नेते प्रकाश (तात्या) पाटील यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथील सु .रा .परिचारक ग्रामीण पतसंस्थेच्या नुतन शाखेचे उद्घाटन कर्नाटक येथील अथणी या ठिकाणी थाटात करण्यात आले. यावेळी तुंगत ग्रामस्थांचेवतीने पाटील यांचे सत्कार डाॅ.आबासाहेब रणदिवे , भिमा कारखान्याचे माजी संचालक दिलीप रणदिवे यांचे हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. तुंगत सारख्या ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करून शेतकरी व्यापारी व तरुण बेरोजगारांना कर्ज देऊन मोठी झेप सु .रा .परिचारक संस्थेने चेअरमन प्रकाश पाटील यांचे नियोजनात घेतली आहे.
बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याने सर्वसामान्यांना कर्ज मिळू लागले पतसंस्थांनीही ग्रामीण भागात संस्था काढून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज झपाट्याने जग बदलत आहे. टेक्नॉलॉजी आत्मसात करून संस्थेसह अनेकांची भरभराट होईल. रोजगाराची निर्मिती पतसंस्थांनी केली, ही चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी पतसंस्था चालकांनी अथक प्रयत्न चालवले आहेत. ठेवीदार कर्जदार यांची सांगड घालून पतसंस्था चालविल्या जातात. ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करण्याचे धाडस पाटील यांनी केले .त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संधी निर्माण करून दिली.
आज सु .रा परिचारक पतसंस्थेचे नाव जिल्ह्यात अग्रक्रमाने घेतले जाते. यास आर्थिक शिस्त व संचालक मंडळातील एकमत महत्वाचे ठरले आहे. स्पर्धेच्या युगात काळाबरोबर बदलावे लागते व्यापारी ग्राहकांना घरबसल्या सुविधा निर्माण झाल्याने वेळेची मोठी बचत झाली असून, वेळेचे नियोजनास अनन्य साधारण महत्व असल्याने त्याचा अंगीकार करावा असे पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही काळानुसार बदलत चालल्याने संस्था प्रगती करू लागल्या आगामी काळात मनुष्यविरहित संस्था राहतील इतक्या योजना यात आलेल्या आहेत सु रा परिचारक पतसंस्थेने ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी वाढत आहेत यानुसार शाखांचा विस्तारही करावा लागत असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले. यावेळी पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी यांचेसह तुंगत ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रणदिवे, शिवाजी इंगळे, बत्तास वनसाळे, विकी आंध आदी उपस्थित होते.


