शु. य. मा. ब्रह्मवृंद संस्थेच्या अध्यक्षपदी जयंत पुराणिक

0

 


पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील श्रीयाज्ञवल्क्य आश्रमात शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन ब्रह्मवृंद संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष श्री. विद्याधर वांगीकर यांचे अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. भाऊसाहेब गंगाखेडकर, श्री. विनायक कुलकर्णी, श्री. गजानन बिडकर यांनी काम पाहिले.नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे...श्री. जयंत गणेश पुराणिक - अध्यक्ष,श्रीकांत प्रल्हाद बारसावडे, प्रकाश विठ्ठलबुवा देवडीकर, बाळकृष्ण दत्तात्रय धाराशिवकर, रामचंद्र (अनिल) पांडुरंग हरिदास, अरुण ज्ञानेश्वर पुरंदरे, उन्मेश  पुरुषोत्तम आटपाडीकर, प्रशांत दिलीप जोशी, अनंत वासुदेवराव कुलकर्णी (गिरवीकर) यांची संचालकपदी निवड करण्यात आली.


नूतन अध्यक्षांचा सत्कार मावळते अध्यक्ष श्री. विद्याधर वांगीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)