सभासदांकडून अजुनही निष्ठा कायम. खरा मतदार मात्र कदापी भुलणार नाही--चेअरमन कल्याणराव काळे

0


पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची लगबग सुरु आहे. अशातच विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी मागील आठवडाभरापासून गांवभेट दौरे सुरु केले आहेत. प्रत्येक सभासदांच्या भेटीघेत असताना मतदारांकडून अजुनही काळे यांचेवर निष्ठा असल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे साखर कारखानादारी मध्ये अनेक संकटे येत असताना काही प्रमाणात चढ उतार येत असतात याची जाणीव या कारखान्यातील सभासदांना पुरेपुर झाली आहे. विरोधकांकडून नाहक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची कट कारस्थान रचले जात आहे. शंभराहून कमी सभासद संख्या असलेल्या गावातूनही हजारो लोकांना सभेला बोलावून विरोधकांकडून गर्दी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला खरा मतदार मात्र कदापी भुलणार नाही. विरोधकांना यावेळी मात्र आपली जादू चालविता येणार नाही असेही सभासदांमधून बोलले जात आहे.



  प्रत्येक ठिकाणी झालेल्या विरोधकांच्या बैठकांमध्ये  सभासदांपेक्षा बिगर सभासद यांनीच मोठा गलगलाट चालविला असून हा गलगलाट मतमोजणी नंतर सर्व काही सांगून जाणार आहे असेही मतदार सभासदांमधून बोलले जात आहे. विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या साथीदारासह जो गांवभेट दौरा केला आहे यामध्ये सभासदांची मने कायम आपल्या बाजुने ठेवण्यात यश मिळविल्याचे पहावयास मिळत आहे.

 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त  कल्याणराव काळे यांची शिरढोण, भंडीशेगाव.वाखरी शेळवे गार्डी लोणारवाडी आधी भागात प्रचारा निमित्त विचार विनमय बैठका पार पडल्या. आज गुरुवारी खेडभोसे, देवडे येथे सकाळी गांवभेटी होणार आहे. .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)