पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी पालकमंत्री यांची भेट घेणार -- शंकर माने

0



सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत 

जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना * राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी * यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती * राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता* प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा * पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना * अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे* पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे* पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे * खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी * पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे  राज्यातील तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांच्या बाबतीत आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने यांनी

सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी तेज न्यूज संपादक प्रशांत माळवदे यांची निवड



प्रशांत माळवदे हे गेली अनेक वर्षांपासून तेज न्यूज चे संपादक म्हणून काम पहात असून पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगलीच जाणीव आहे. प्रशांत माळवदे पंढरपूर येथील पत्रकारांच्या प्रश्नावर प्रभावी पणे काम करत असून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली असून   प्रशांत माळवदे हे नेहमीच पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जातात युवा व धाडसी पत्रकार म्हणून त्यांनी पंढरपूर तालुक्यात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे  प्रशांत माळवदे यांनी यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी असताना पत्रकारांच्या विविध प्रश्नावर चांगली भूमिका घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य पंढरपूर तालुक्यात पोहोचवण्याचे जबाबदारी समर्थ पणे पार पाडली होती त्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी  पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा  संपर्क प्रमुख म्हणून निवड केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)