कर्मयोगी श्री.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामन माने यांच्या अध्यक्षतेखाली, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषराव माने, विजयराज डोंगरे, पांडुरंग सहकारी साखर संचालक हरीशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईचे सीईओ पंडितराव देशमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आप्पासाहेब चव्हाण सर यांच्यावरील आठवणींच्या लेखांच्या संस्कारदीप या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. तसेच पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आनंद नगरकर यांचा सामाजिक कार्याबद्दल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल तर हरवलेल्या कथेच्या शोधात या कथासंग्रहाचे लेखक प्रा.सीताराम सावंत यांना साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण स्मृति पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अमरसिंह चव्हाण,अमोल चव्हाण व प्रतापसिंह चव्हाण व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
श्री.आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींच्या लेखांच्या संस्कारदीप या स्मरणिकेचे प्रकाशन
मे ०२, २०२३
0