पंढरपूर / प्रतिनिधि . समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने नवलेखक पुस्तक प्रकाशन योजनेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समीक्षा पब्लिकेशनचे प्रकाशक श्री. प्रविण भाकरे यांनी दिली
समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने छत्रपत्री संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नवलेखक पुस्तक प्रकाशन योजनेचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक, नाटक समीक्षा ग्रंथ, संदर्भ ग्रंथ या साहित्य प्रकारात ना नफा ना तोटा या तत्वावर 21 पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक १९ एप्रिल ते 30 एप्रिल २०२३ पर्यंत समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर मो 9689141201 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


