देगावच्या उपसरपंचपदी पत्रकार समाधान भोई यांची बिनविरोध निवड.

0



पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील उपक्रममशील ग्रामपंचायत देगाव च्या उपसरपंचपदी पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य समाधान भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आहे.या ग्रामपंचायतीचे उपसरपंच रणजीत बनगोसावी यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेवर समाधान भोई यांची निवड करण्यात आली आहे. समाधान भोई यांनी आपल्या परखड आणि निर्भिड पत्रकारितेने ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर तोडगा काढून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. युवा उद्योजक व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजित पाटील यांचे ते अत्यंत जवळचे. व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पंढरपूर येथील पत्रकार सुरक्षा समिती या संपूर्ण राज्यात क्रियाशील असणाऱ्या संघटनेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामभाऊ सरवदे यांच्या सोबत पत्रकारिता क्षेत्रात भोई समजोपायोगी कार्य करीत आहेत.



१३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सौ. सीमा संजय घाडगे या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत.समाधान भोई यांच्या या निवडीसाठी ग्रा.सदस्य समीर शेख, रणजीत बनगोसावी,सदस्य धर्मेंद्र घाडगे, सदस्य बाळू वायदंडे, सदस्या सौ भाग्यश्री घाडगे, सदस्या सुरवंता खरात, सदस्या सौ सीताबाई वायदंडे आदींसह राष्ट्रवादी उपाध्यक्ष धनाजी घाडगे, संजय घाडगे,नंदकुमार बनगोसावी, झाकीर शेख,पांडुरंग वाघमारे,गणेश लेंडवे, समाधान घाडगे,कैलास वायदंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)