संजय मस्के यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण तर्फे उद्योग क्षेत्रातील पुरस्कार

0



संजय मस्के यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण तर्फे उद्योग क्षेत्रातील पुरस्कार

15 हजार रूपयांच्या उसनवारीवर  व्यवसायाची सुरूवात

5 भाऊ व एक बहीण एवढ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून व्यवसायात सन्मान मिळविला

कुटुंबातील सर्वांनाच म्हणजे भाऊ,बहिण, पुतणे,भाचे यांना योग्य दिशेने  वाटचाल व  आर्थिक मदत व प्रोत्साहन दिले व त्यांनीही सत्कारणी लावले त्यामुळे संजय मस्के यांना सर्वांनीच गुरूस्थानी मानले. 

संजय मस्के व त्यांना उच्चपदावर नेणार्‍या त्यांच्या धर्मपत्नी अश्‍विनी यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे खुप आनंद वाटला खरे तर संजय मस्के हे शेतकरी कुटंबातील यांचे वडील प्रहाद मस्के व सौ.कमल मस्के शेतकरी असल्यामुळे घरातील शेतीची कामे करून व घरात दुभती जनावरे असल्यामुळे घरातील कुटुंबाची गरज असेल तेवढे दुध ठेऊन बाकीचे दुध रतीबाने वाढून व शेतीतील भाजीपाला विकून त्या आलेल्या  उत्पादनातून एवढ्या मोठ्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्याचवेळेस याच कुटुंबातील पाच भावंडातील संजय मस्के यांनी ग्रज्युएट डिग्री मिळाल्यानंतर काय करायचे म्हणून गोपाळपूरात यशवंतराव चव्हाण फलोत्पादन संस्थेत 500 रू महिना पगारावर नोकरी चालू केली.1993 पासून  सुरूवात केली शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन ,बॉक्स पॅकींग करणे,गाडी लोड करणे व शेतकर्‍याला दिलासा देणे असे काम केले. अपार कष्ट कोणत्याही वेळी कधी कुठेही जाणे व शेतकर्‍यांना मदत करणे या कारणामुळे  याच काळात  जनमानसात ओळख निर्माण झाली. स्पष्ट बोलणे व स्वच्छ काम या जोरावर अनेक भागातील शेतकरी व माल खरेदी करणार्‍या व्यापार्‍याबरोबर संबंध जुळले या कालावधीमध्ये पतसंस्थेचे कामकाज जोरात चालू होते पण काही कारणाने यात व्यत्यय आल्यामुळे ही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आली. आणि नेमके याच कालावधीत माझ्या लग्नाचा मुहूर्त निघाला, लग्न झाले आणि काम गेले आता काय करावयाचे या विवंचनेत रोज गोपाळपूरात येणे  व संस्थेच्या शेड मध्ये गप्पा मारणे व तेथेच दिवस घालवणे असा नित्यक्रम चालू होता. मी काम करत असल्यामुळे मला माहीत होते की आता आपले भविष्य धोक्यात आहे.आता कामच गेले पुढे काय हे प्रश्‍नचिन्ह होते, पण नियतीपुढे काही चालत नाही असे म्हणत चालढकल चालू होती. या संस्थेत रात्र रात्र राबून बॉक्स भरण्यापासून ते गाडी भरण्यापर्यत सर्व कामे प्रामाणिक पणे केले. संस्था बंद झाली तरी या संस्थेत येऊन दिवस रात्र  येथे बसून काढले. कुणाला काय सांगावे हेच कळत नव्हते. जे घडू नये ते नेमके घडले संस्था बंद पडली मग आता नेमके काय करावे हेच सुचेनासे झाले. पण वामनतात्या बंदपट्टे व काही मार्गदर्शक  व मित्र भेटले व त्यांनी सल्ला दिल्याप्रमाणे गोपाळपूरात ग्रामपंचायतीच्या जागेत माझा स्वत:चा व्यवसाय चालू केला.या व्यवसायासाठी मला व्यवसाय सुरू करण्याकरिता व शेड मारण्याकरिता माणुसकी व आपलेपणा व प्रामाणिकपणा म्हणून परगावातील व्यापार्‍यांनी माझ्यावर विश्‍वास ठेऊन 15 हजार रू.चा ड्राप्ट दिला ही रक्कम त्याकाळात खुप मोठी होती माझा मलाही विश्‍वास नव्हता की आपल्याला कोणी एवढी रक्कम देईल  पण माझ्यातील माणुसकी व  प्रामाणिकपणा यामुळे मला त्याकाळात मदत मिळाली त्यांचे आभार कसे माणावे हेच कळले नाही पण वेळोवेळी त्यांचे ऋण मी फेडले.पण अगदी मला घरातील व गावातील माणसांनी मदत केली नाही पण या माणसांनी मदत केली व त्या संधीचे सोने करूनच  त्या रकमेवरच मी या व्यवसायाची सुरूवात केली. 

सुरूवातीला भिती होती आपल्याकडे कोण येणार व आपल्यावर कोण विश्‍वास ठेवणार अशा शंका येत होत्या पण काही दिवस संस्थेत काम करून मी जी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व शेतकर्‍यांचा फायदा केला तोच त्यांचा आशिर्वाद माझ्या कामी आला व माझ्या व्यवसायाची सुरूवात झाली.  सुरूवातीला गोपाळपूरातच श्रीकृष्ण फु्रट सप्लायर्स या नांवाने फर्म सुरू केली. त्यास प्रामुख्याने अनवली,कासेगाव येथील शेतकर्‍यांनी विश्‍वास दाखविला व त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सर्व गावात माझे नाव चर्चेला आले व  व्यवसाय वाढत चालला. माझ्या नावाचा बोलबाला झाल्यानंतर सगळ्यानीच मला सहकार्य करण्याचे ठरविले माल दिला की जागेवरच रक्कम सांगून वाटप सुरू केले व व्यवसायाला चालना मिळाली यात अनेकांनी मदत केली.  त्यात प्रामुख्याने गोपाळापूरातील ग्रामस्थ, श्रध्देय आ.सुधाकरपंत परिचारक, मा.प्रशांत परिचारक, मा.उमेश परिचारक व माझा मित्र परिवार यांनी खुप सहकार्य केले.

         या नंतर मी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यवसाय चालू केला.यात मा.प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मी जे काही शेतकरी व व्यापारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले होते ते माझ्या व्यवसायासाठी मौल्यवान ठरले. यानंतर मी कधीही पाठीमागे बघण्याचा प्रसंगच उद्भला नाही व तो प्रसंगही माझ्यावर आला नाही पांडुरंग  कृपेने माझ्या व्यवसायात मला कधीही अडचण आली नाही पण पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले.

      माझ्या कुटुंबातील विलास मस्के हे सध्या गोपाळपूर ग्रामपंचायतीेचे सरपंच आहेत, तर सुभाष मस्के हे प्रशांतराव परिचारक व उमेश परिचारक यांचे निकटवर्तीय व भारतीय जनता पार्टीचे अखंड नेतृत्व करीत आहेत.तर याच काळात माझे पुतणे अभिजीत मस्के यांनीही नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे.  प्रामाणिक पणा मस्के घराण्याकडून शिकण्यासारखा आहे. मस्के परिवारातील सर्वच सदस्य आज उंच शिखरावर आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे कामावरील निष्टा, प्रामाणिकपणा, या गुणावर संजय मस्के यांना प्रत्येक ठिकाणी मान मिळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण यांनी संजय मस्के यांना  पुरस्कार दिल्याबद्दल या संस्थेतील सर्वच पदाधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.योग्य व्यक्तीचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार.....

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)