मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात बनविले पर्यावरण पुरक आकाश कंदील...*

0



पंढरपूर -: श्री.रुक्मिणी विद्यापीठ विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वरम्मा विद्यालय व जुनिअर कॉलेज पंढरपूर येथील इयत्ता आठवी वर्गातील हरित सेना मुला मुलींनी संस्था सचिवा सौ सुनेत्राताई पवार यांचे प्रेरणेतून रंगित कागद,डिंक यांचा वापर करून पर्यावरण पूरक आकाशदिवे तयार केले .

यावेळी प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक व फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करून पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ओळखून सर्वांनी जमिनीवरील सर्व जैविक व अजैविक घटकांचे रक्षण होणे काही प्रयत्न करुन सर्वांनीच स्वच्छ व सुंदर शाळा, गाव व आपला परिसर करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले .
या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक पांडुरंग शिंदे ,कुमुदिनी सरदार ,माधुरी बोडके, सविता लोखंडे, विभावरी डुबल, मनीषा पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ही कार्यशाळा यशस्वी केली .
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)