पंढरपूर- वाखरी बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा ८.०० कि.मी रस्ता राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सिमेंटकॉंक्रीट करणेसाठी १५० कोटी मंजूर झाले असून या रस्त्यामधील गटारी, पाइपलाइन व वीज वितरण स्थानांतरणासाठी १५ कोटी रूपये निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेमार्ङ्गेत वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रस्तावित रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. यामध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते भोसले चौक येथे ओव्हर ब्रिज (उड्डानपूलसह) मंजूरी देण्यात आलेली आहे.
दरम्यान सदर काम करताना या रस्त्यावरील भुयारी गटारी, पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था यांचे स्थानांतरण करण्याचे काम पंढरपूर नगरपरिषदेने करायचे आहे. या कामासाठी १५ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्यामुळे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना पत्र देवून मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी पत्राची दखल घेत पंढरपूर नगरपरिषदेचा प्रस्ताव दाखल करावा त्यानंतर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.


