जिल्हयात जो राजकीय दबदबा आणि ताकत जी नानांनी उभी केली ती परत मिळवून देऊ : प्रणिताताई भालके

0

 



पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. भगिरथ भालके गट, अभिजीत पाटील गट, युवराज पाटील गट, यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक जण आपआपल्या कुवतीप्रमाणे प्रचार करत आहे. गेली दोन वर्षे कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी ऊस बील, कामगारांचे पगार थकले असल्यामुळे हा मुद्दा प्रत्येक पॅनलने घेतला आहे. हे सर्व मुद्दे सर्व सामान्य शेतकरी व कामगार यांनाही माहीत आहे त्यामुळे यावर ते जास्त  विचार करत नाहीत.
   प्रणिताताई भालके यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्ग, व कामगारात मिसळून त्यांनी अनेकांच्या अडी अडचणी जाणून घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून प्रणिताताई यांनी मतदार संघात सुख दु:खात गाठी भेठी घेऊन जनसामान्यात सक्रीय राहून सर्वांना आपलेसे करून घेतले आहे. आज निवडणूक प्रचाराच्या दौरात त्यांनी  सरकोली गटातील शिरगांव,एकलासपुर, सिद्धेवाडी,चिंचुंबे,तावशी तनाळी,तपकिरी शेटफळ, खर्डी येथील सभासद शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन आगामी काळात कारखाना चालू करून परत स्व.नानांनी जी सभासद शेतकरी वर्गाला अडचणी च्या काळात मदत केली कारखान्याची क्षमता वाढवून वेगवेगळे प्रकल्प उभा केले उच्च दर दिला त्याच भूमकेतून इथून पुढच्या काळात वाटचाल करून विठ्ठल परिवार म्हणून जिल्ह्यात जो राजकीय दबदबा आणि ताकद जी नानांनी उभी केली ती परत मिळवून आपण वाटचाल करु असा डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांनी विश्वास दिला.डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांनी आज शिरगांव, एकलासपुर, सिद्धेवाडी चीचुंबे, तावशी, तनाळी, तपकीरी शेटफळ, खर्डी या गावामध्ये सभासद यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यांच्या सोबत गोकुळ दादा जाधव, माजी संचालक,दिपक सदाबसे माजी संचालक त्या भागातील सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)