सौ.ज्योती बागल यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर.

0

  


सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघ आयोजित विद्याताई परबत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार यशकिर्ती माध्यमिक विद्यालय पंढरपूरच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती बागल यांना जाहीर झाला आहे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी त्यांना आशीर्वाद दिले. संस्थेचे अध्यक्ष जयंत मोडक सचिव डॉ. एम. आर टकले तसेच पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर ,सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ मुचंडे,उपाध्यक्ष श्री आगतराव भोसले, सचिव सुरेश वगरे, जिल्हा संचालक दादासो कोळी, पंढरपूर तालुका इंग्रजी अध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी दांडगे,खजिनदार बाबुराव काकडे, सहसचिव संतोष पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)