ही बातमी समाज सेवक रणजीत देठे यांच्या वाचनात आली असता त्यांनी कोणताही विचार न करता मी हा रस्ता स्वखर्चाने माऊली नगरचा रहिवाशांसाठी करून देतो असे सांगितले आणि लगेचच कामाला सुरुवात करत रस्त्याचे संपूर्ण काम अतिशय उत्तम प्रतीचे करून घेतले त्यामुळे नागरिकांमधून या कामाची प्रशांसा होत असून माननीय श्री रणजीत देठे यांचे संपूर्ण माऊली नगर नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.
तसेच आमच्या बातमीची दखल घेऊन नागरिकांना जी मदत केली त्याबद्दल साप्ताहिक पंढरी सत्यता परिवारातर्फे ही आम्ही त्यांचे सहर्ष आभार मानतो

