लवकरच महाविद्यालयाची बेल वाजणार, तसेच शाळेची घंटा ही वाजू शकते लवकरच...

0
येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात येऊ शकतो.
     तसेच महाराष्ट्र मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत काही ठिकाणी जवळपास एक लाखाहून जास्त लस शिल्लक राहत आहे मात्र पुणे मुंबई मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे १ ऑक्टोंबर ची परिस्थिती पाहून जर महाविद्यालयातील सर्व टिचिंग तसेच नॉन टीचिंग स्टाफ चे दोन्ही लसीचा डोस जर झाले असतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे दोन्ही लसीचे डोस जर झाले असतील तर माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशानुसार महाविद्यालय टप्प्याटप्प्याने चालू करू आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाबाबत डब्ल्यू एच ओ नी जर परवानगी दिली तर आपण 18 वर्षाखालील लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रारंभ करू असे माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)