सोलापूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवावे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजने बरोबरच जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात लसीकरणाचे योग्य नियोजन करावे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत नियोजन भवन, सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
लसीकरणाचे नियोजन करत असताना लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाउनच्या माध्यमातून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, पोलीस विभागाने काटेकोर नियोजन करावे.
जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवियरचा पुरवठा सुरळीत राहिल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर गरजेपुरताच करावा. हे इंजेक्शन पात्र व गरजू रुग्णांना देण्यात येत असल्याची खातरजमा करावी. जिल्ह्यातील मृत्यूदर संख्या कमी करण्यासाठी वेळेत उपचार करावेत तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.



