पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक 2021 पुर्वीच संपुर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊन मध्ये पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक असल्यामुळे वगळण्यात आला होता. पण पोटनिवडणुकी नंतर मात्र कोरोना संक्रमणाचा उद्रेक वाढत गेला व त्यातच मुत्युचे प्रमाण वाढलेले दिसुन आले.त्यामुळेच प्रशासनाला काही काठोर निर्णय घ्यावे लागले.मा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या आदेशानंतर संपुर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावले गेले.
गेले काही दिवसापासून असलेल्या लॉकडाऊन मुळे तसेच झालेल्या पोटनिवडणूकी मुळे पोलिस प्रशासन रात्र व दिवस आपल्या सेवेसाठी तत्पर उभे आहे. तसे पाहता पोलिस प्रशासनाला कोरोना संक्रमणाचा धोका खुप मोठा असतो. तरी ही जिवाची तमा न बाळगता फक्त नागरिकाच्या जिवासाठी पोलीस प्रशासन अविरत सेवा पुरवित आहे. फुल नाही फुलाची पाकळी असे उद्देश ठेवून अभाविप पंढरपूर यांच्या वतिने पंढरपूर शहर पोलिस स्थानक, पंढरपूर तालुका पोलिस स्थानक, तसेच ज्या चौकात पोलिस बदोबस्तासाठी तैनात आहेत. अशा ठिकाणी जाऊन पोलिस बांधवाच्या सुरक्षिततेसाठी आयुर्वेेदिक काढा व आयुर्वेदिक औषधाचे वाटप करण्यात आले.





