पंढरपूर युवा मुद्रक संस्थे तर्फे मुद्रण दिन संपन्न

0

पंढरपूर येथे मुद्रण दिनानिमित्त जॉन गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मुद्रण दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष दत्ता पाटील व सदस्य मंदार केसकर यांनी मुद्रणा व्यवसायातील अडचणी सांगितल्या गेल्या वर्षभर मुद्रण व्यवसाय बंद असल्यामुळे ग्रामीण मुद्रकांचे  अत्यंत हाल झाले आहेत. व्यवसाय नसल्यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच मुद्रक बांधवाच्या स्पर्धेमुळे धड कोणालाच नफा मिळत नाही. ग्रामीण भागात मुळातच व्यवसाय कमी आहे त्यातच एकाच कामासाठी अनेक मुद्रक स्पर्धा करून स्वतःचे व दुसऱ्या मुद्रकांचे  नुकसान करीत आहेत. याला मुद्रकांचा  ही दोष नाही पण एक मेकाची कामे तोडल्यामुळे मुद्रकांत रोष निर्माण होतो व त्यामुळे मुद्रकांची  एकी होत नाही आणि निष्कारण एकमेकाबद्दल रोष निर्माण होत आहे. अशी संकल्पना मांडली गेली यावेळी कल्पक पेपर्सचे रफिक भाई नागठाण यांच्या हस्ते मुद्रणाचे प्रणेते  जॉन गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर संस्थेचे ज्येष्ठ मुद्रक श्रीरंग जाधव यांच्या हस्ते रफिक नागठाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील मंदार केसकर,श्री श्रीनाथ साळुंखे,रामकृष्ण बिडकर, गणेश बागडे,संतोष गोंजारी,मकरंद वैद्य,शिवम पाटील,मोरे,श्रीरंग जाधव,सोमनाथ शिंदे,जगदीश लकेरी,गणेश वायचळ, संजय यादव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कल्पक पेपरचे रफिक नागठाण यांच्यातर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता त्याचा लाभ सर्व मुद्रकांनी घेतला सदर कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळून केला गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)