हनुमानगर, माऊलीनगर व उपनगरातील पाणीपुरवठा बंद

0
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेच्या सहकार्याने अनेक उपनगरात  न.पा.च्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. उपनगरातील लोकांनी मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांना विनंती केल्यानंतर यासाठी येणारा काही खर्च लोकवर्गणीतुन करावा व बाकी नगरपरिषद करेल  असे सुचविले होते त्यानुसार नागरिक व आमदार मा. प्रशांत परिचारक  यांच्या मध्यस्तीने हा पाणीपुरवठा चालु केला होता. त्यास न.पा.ने त्यांची रितसर रक्कम भरून उपनगरातील लोकांना पाणीपुरवठा केला. यावेळी आमदार परिचारक यांनी स्वत: लक्ष घालून उपनगरातील लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून न.पा.च्या वतीने कायदेशीर बाबी पुर्ण करून पाणीपुरवठा चालु केला. 
     नवीन वसाहतीत लोकांची वाढ होत गेली. व नवीन उपनगरे स्थापन झाली. यांचा परिणाम पाणीपुरवठा यावर होत गेला. खरे तर सुरूवातीला लोकसंख्या कमी असल्यामुळे 4 इंच  पाईप टाकून पाणीपुरवठा केला जात होता. पण नवीन नागरिकांनी   पाईप मोठी टाकून आपल्या नगरात पाणी नेण्याचा प्रयत्न केला. यात जुने कनेक्शन असलेल्या लोकांनाच पुर्ण दाबाने पाणी येत नव्हते. अनेकांची ओरड होत होती. त्यातच हनुमान नगर, माऊलीनगर याभागातील लोकांनाच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना अचानक एके दिवशी जेसीबी घेऊन, कुठलीही परवानगी नसताना माऊलीनगर परिसरातील पाईपलाईनला व्हाल्व बसविला. सदर व्हॉल्व कायदेशीर नसताना एक दिवस तुम्ही पाणी घ्या व एक दिवस आम्ही पाणी घेतो असे म्हणून कुणाचीही परवानगी न घेता व्हॉल्व बसविला पण माऊलीनगरात मुळातच पाणी कमी येत असल्यामुळे नागरिकांतून विरोध झाला. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही स्वत: स्वतंत्र पाईप टाकून पाणी घ्यावे असे नागरिकांनी सुनावले, पण आमच्या नगरातील पाणी बंद करू नये म्हणून माऊलीनगरातील सर्व लोक एकत्र होऊन या व्हाॕल्वला विरोध झाला. व त्याचवेळेस बसविलेल्या व्हॉल्व्ह बंद करणेत आला. 
सदर ची घटना कळल्यानंतर काही आत्मघातकी लोकांनी आपल्या पध्दतीने, वशिलांने हनुमानगर,माऊलीनगर या भागातील पाणीपुरवठा बंद केला. आम्हांला नाही तर तुम्हाला पण नाही असे तत्व स्विकारले. आज दोन दिवस झाले सदर नगरात पाणी नाही. यावेळी सदर विभागातील ग्रा.पं.सदस्याना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत आम्हाला कुठलीही माहिती नाही असे सांगितले. मग या उपनगरात नेमके काय घडले आहे व पाणी पुरवठा कोणामुळे बंद झाला आहे. सध्या कोरोना संसर्गजन्य विषाणुचा आजार असल्यामुळे सर्व शासकीय माणसे या रोगांसाठी झगडत आहेत. अशा परिस्थितीत उपनगरातील कुठलेही कारण नसताना पाणीपुरवठा बंद केला आहे. तो तात्काळ चालू करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)