लॉक डाऊन 3 कालावधीत नागरिकांना काही सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या

1
देशातील कोरोना संकटाची सद्यस्थिती पाहता केंद्र सरकारतर्फे आज देशव्यापी लॉक डाऊनला आणखी २ आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली असून देशभरामध्ये येत्या १७ मेपर्यंत लॉक डाऊन लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कालावधीत नागरिकांना काही सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले त्यांनी काही सूचना दिल्या
1) बाहेर गावाहून येणारे प्रत्येक व्यक्ती वर लक्ष ठेवावे.
2)बाहेरून् आलेल्या व्यक्ती ला होम क्वारंटाईल करावे घरात जागा नसल्यास त्यांना शाळेत वा मठात ठेवा 14 दिवस झाल्यावर त्यांना घरी घ्या. 
3)शेती   कामे सुरू असावीत शेती  साठी शक्यतो गावातील स्थानिक व विश्वासाह॔  मजूर असावेत.
4)शेतीमालाच्या वाहतूकीस जी वाहने येतात त्यांच्या ड्रायव्हरना  शक्यतो गाडीतच   झोपण्यास सांगावे शक्यतो ते गावात ईतरत्र फिरणार नाहीत याची   दक्षता घ्यावी.          5)धार्मिक  कार्यक्रम,सण,उत्सव,समारंभ,हळदी कुंकू शक्यतो करू नयेत. शासनाचे पुढील आदेशा पर्यंत ते रद्द करावेत.
6)किराणा माल,औषधे,भाजी पाला यांचे नियोजन घर पोहोच सेवा देण्याचे असावे या साठी सरपंच व ग्रामस्तरीय समिती यांनी नियोजन करा.
7)गावातील मेडिकल दुकाने,हॉस्पिटल,किराणा दुकाने,कृषी सेवा केंद्रे,रेशन धान्य दुकाने,शासकीय स्टोअर्स,शासकीय निम शासकीय कार्यालये स्चच्छ ठेवावीत त्यांचे निरजंतुकिकरण करावे.
8)सर्व ग्रामपंचायती, यांच्या बैठका मोकळ्या मैदानात व सावली मध्ये घ्याव्या.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा