पंढरपूर : कोरोनापासून जनतेचे रक्षण होण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणार्या पंढरपूर पोलीस व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी 24 तास काम करत आहेत त्यामुळे आम्ही फुल ना फुलाची पाकळी असा विचार करून मदत म्हणून दत्ता दहिवडकर कापड दुकान व टेलर पंढरपूर व एस आर शूज पंढरपूर यांच्या तर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन तसेच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांसाठी अल्पोउपहार,चिवड्याचे पाकीट व सोनपापडी चे वाटप करण्यात आले. तसेच जनतेच्या रक्षणा साठी आपण आहोरात्र प्रयत्न करत आहात या साठी सर्वांच्या तर्फे त्याचे आभार मानन्यात आले. या प्रसंगी श्री.नागनाथ बापू माळी रोपळे व श्री.सत्यवान दहिवडकर कोर्टी हे उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी 24 तास काम करत असलेल्या पोलीसांना अल्पोउपहार चे वाटप करून मानले धन्यवाद !
एप्रिल ०२, २०२०
0
Tags



