गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ... गुढीपूजनाचा मुहूर्त

0
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपूजनाचा विशेष असा मुहूर्त नसतो.सूर्योदयापासून गुढीपूजन करता येते.
       चैत्र प्रतिपदा हुभारंभः मंगळवार, २४ मार्च २०२०दुपारी २ वाजून ५८ मिनिटे
      चैत्र प्रतिपदा समाप्तीः बुधवार, २५ मार्च २०२० सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटे
विशेष टीप: आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची मानली जात असल्यामुळे गुढीपाडवा आणि पूजन २५ मार्च २०२० रोजी करावे. गुढीपूजन केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी उतरवून ठेवावी.
सूर्योदय: सकाळी ६.३९
सूर्यास्त: सायंकाळी ६.५0

शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण आहे. यंदाचा गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच आहे.

पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य गुढीपाडव्यासाठी खरेदी केलं जातं. पण यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याची खरेदी न करताच गुढीपाडवा साजरा करणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)